Wed. Aug 4th, 2021

मुंबईसह विविध महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान

मुंबई : मुंबईसह विविध पाच महानगरपालिकेतील सात रिक्त पदांसाठीची पोटनिवडणूकीसाठीची 9 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर आणि पनवेल या महानगरपालिकेत एकूण सात नगरसेवक पदांसाठी मतदान होणार आहे.

तसेच मतमोजणी 10 जानेवारी 2020 ला होणार आहे. अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस मदान यांनी दिली.

यासाठी 16 ते 23 डिसेंबर या कालवधीत अर्ज दाखल करता येणार आहे. 16 ते ते 23 डिसेंबर या कालावधीत 22 डिसेंबरला रविवार आहे. त्यामुळे 22 डिसेंबरला अर्ज स्वीकारले जाणार नाही. इच्छुकांच्या अर्जाची छाननी 24 डिसेंबरला करण्यात येईल. 26 डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

उमेदवारांना 27 डिसेंबरला निवडणूक चिन्हे देण्यात येतील. 9 जानेवारी 2020 ला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल. तर मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.

पोटनिवडणूक आणि महानगरपालिकानिहाय प्रभाग


नाशिक- 22अ आणि 26अमालेगाव- 12 ड
नागपूर- 12ड
लातूर- 11अ
पनवेल – 19ब
मुंबई – 141

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *