Wed. Jul 28th, 2021

श्वास नलिकेत फुगा अडकून 6 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

नागपूरमध्ये फुगा श्वसननलिकेत अडकून एका 6 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

सानिध्य आनंद उरकुडे असे मृत चिमुकल्याचं नाव आहे. खेळता-खेळताच सानिध्यचा मृत्यू झाला आहे. ही घटना 25 जानेवारी रोजी रात्री घडली.

सानिध्य हा शुक्रवारी (दि. 25) रात्री आपल्या घरासमोर खेळत होता. त्याच्याकडे एक फुगा होता. फुगा फुगवत असतानाच सानिध्यने चुकून तो फुगा गिळला. तो फुगा त्याच्या श्वासनलिकेत जाऊन अडकला.

फुगा गिळल्याने त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला व तो रडू लागला. त्याच्या आई-वडिलांनी त्याला त्वरीत डॉक्टरांकडे नेले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

या दुर्दैवी घटनेनंतर नागपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *