Mon. May 10th, 2021

धक्कादायक! 60 वर्षांच्या व्यक्तीचा दोन चिमुरडींवर अत्याचार

कोथरुडमधील सुतारदरा येथे साडेचार व साडेतीन वर्षाच्या मुलींवर शेजारी राहणाऱ्या एका 60 वर्षाच्या ज्येष्ठाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला.

कोथरुड पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं ?

कोथरुडमधील सुतारदरा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या एका कुटुंबातील आई-वडील दोन मुलींना घरात ठेवून काही कामासाठी बाहेर गेले होते.

त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 60 वर्षांच्या व्यक्तीने या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला.

हा प्रकार त्या मुलींच्या आत्याच्या 5 वर्षीय मुलाने पाहिला.

संध्याकाळी मुलींची आई घरी आल्यावर या मुलाने शेजाऱ्याने केलेल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली.

पीडित मुलींच्या आईने या प्रकरणी शेजाऱ्याला जाब विचारल्यावर तो गडबडून गेला.

मुलींच्या आईने पोलिसांकडे तक्रार करतो, असे म्हटल्यावर आरोपीने पळ काढला. पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर कोथरुड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला.

सध्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *