अदाणींकडून ६०,००० कोटींची देणगी 

अदाणी समूह हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात वेगाने वृद्धिंगत होत असलेला विविध क्षेत्रात कार्यरत असलेला समूह आहे. गौतम अदाणी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांचा वडिलांच्या १०० व्या जयंतीच्या निमित्ताने अदाणी कुटुंबाकडून ६०,००० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. अदाणी फाऊंडेशनद्वारे या निधीचे वाटप केले जाणार आहे. आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासाशी संबंधित उपक्रमांसाठी ही देणगी दिली आहे. यातील जास्तीत जास्त भाग हा ग्रामीण भागासाठी जाहीर करण्यात आला आहे. अदाणी कुटुंबाच्या या योगदानामुळे ‘ग्रोथ विथ गुडनेस’ हे समूहाचे ब्रीदवाक्य आम्ही प्रत्यक्षात आणू शकतो, असे गौतम अदाणी म्हणाले.
अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि वि. प्रो. लिमिटेडचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी अशा प्रयत्नासाठी मी गौतम अदाणी आणि त्यांच्या फाउंडेशनला शुभेच्छा देत असल्याचे सांगितले.