Fri. Sep 30th, 2022

काश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन! लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमाला वेंकटेश्वर मंदिर सांभाळणारे तिरुमाला तिरुपती देवस्थान काश्मीरमध्ये त्यांचे पहिले मंदिर बांधणार आहेत. काश्मीर प्रशासनाने मंदिर आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ६२ एकर जमीन टीटीडीकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे.

जम्मू-काश्मीर प्रशासकीय समितीच्या बैठकीत जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी टीटीडीला ४० वर्षांच्या कालावधीसाठी जमीन हस्तांतरित करण्यास मान्यता दिली.

मंदिरात यात्रेच्या सुविधा संकुल, आध्यात्मिक आणि ध्यान केंद्र, पार्किंग यांसह अन्य पायाभूत सुविधासुद्धा उपलब्ध असतील. तसेच भविष्यात या मंदिराच्या परिसरात वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधादेखील असणार आहेत. १९३२ साली स्थापन केलेली टीटीडी ही आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची सेवाभावी संस्था आहे. या मंदीरामुळे देशातील पर्यटन विकासास चालना मिळेल असे म्हटले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.