सीमांचल एक्सप्रेसला भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये सीमांचल एक्सप्रेसचे 9 डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

हाजीपूर-बछवाडा दरम्यान जोगबनीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या या सीमांचल एक्सप्रेसला पहाटे 4  वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, एक्स्प्रेसचे डबे एकमेकांवर आले. एक द्वितीय श्रेणीचा डबा, वातानुकूलित B3, S8, S9, S10 या डब्यांसह आणखी चार डबे रुळांवरून घसरले असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

रेल्वेने अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 5 लाख रुपये, गंभीर जखमींना 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, प्रथमदर्शनी हा अपघात रेल्वे रुळाला तडा गेल्याने झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Exit mobile version