Wed. Aug 4th, 2021

छत्तीसगडमध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमध्ये जिल्हा राखीव दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

छत्तीसगडमध्ये जिल्हा राखीव दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. या नक्षलवाद्यांमध्ये 4 पुरूष तर 3 महिलांचा समावेश आहे.यावेळी या नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे्. या शस्त्रसाठ्यात एके- 47 च्या 303 रायफल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

सात नक्षलवाद्यांचा खात्मा

राजनंदगावमधील बगनादी येथे सीतागोटा जंगल परिसरात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. यामध्ये सात नक्षलवादयांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि स्फोटकं जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात नक्षली कारवाया सुरूच आहेत.

या चकमकीत 3 जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच नक्षलवाद्यांमध्ये 4 पुरूष तर 3 महिलांचा समावेश आहे.

या शस्त्रसाठ्यात एके- 47 च्या 303 रायफल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *