Thu. Sep 16th, 2021

माळीण दुर्घटनेला ७ वर्ष पूर्ण

रायगड : रायगड जिल्ह्यातील तळीये गावात माळीणची पुनरावृत्ती झाली आणि तब्बल ७२ जणांनी आपले प्राण या दुर्घटनेत गमावले , संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडली गेली आणि होत्याचं नव्हतं झालं.

३० जुलै २०१४ रोजी देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली आणि पुणे जिल्ह्यातील संपूर्ण माळीण गाव जमीनदोस्त झाले.या घटनेला आता सात वर्षे पूर्ण झाली आहेत. या घटनेत बचावलेल्या नागरिकांना घरे बांधून दिली त्यांना आर्थिक मदत देखील केली मात्र बांधून दिलेल्या घराच्या चार भिंतीमध्ये वास्तव्यास गुण्यागोविंदाने नांदणारे कुटुंबतील माणस मात्र उरले नाही. सात वर्षांपूर्वी माळीणच्या या दुर्घटनेत तब्बल १५१ जणांना आपले प्राण गमवावे लागले.
नेस्तनाबूत झालेल्या माळीण गावाचे शासनाने नवीन जागेवर पुनर्वसन केले. प्राण गमावलेल्या १५१ नागरिकांची नावे कोरून ‘स्मृतिस्तंभ’ उभारले,  एवढंच काय तर याच नागरिकांच्या नावे प्रत्येकी एक झाड लावून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला आहे. मात्र आजही त्या सात वर्षांपुर्वीच्या उजाडलेल्या काळ्या दिवसाची आठवण काढून उर्वरित नागरिक आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *