Fri. May 29th, 2020

राज्यात 725 व्हर्च्युअल क्लासरूम्स होणार सुरू

राज्यातल्या शालेय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या 725 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लास रूम सुरु करण्यात येणार आहे. त्यातल्या 195 व्हर्च्युअल क्लास रूम्सचं उद्घाटन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यातल्या ई-बालभारती संस्थेत या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं.

यावेळी वर्षा गायकवाड यांनी व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्याच सोबत 8 ते 10वीच्या अंध विद्यार्थ्यांसाठी बोलकी पुस्तकं तयार करण्यात आली आहेत. त्यांचंही उद्घाटन यावेळी करण्यात आलं.

यावेळी वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाकडून केल्या जाणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला.

शालेय शिक्षण विभागाची संबंधित विविध विषय विद्यार्थ्यांच्या अडचणी शाळांच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने विभागामार्फत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येतोय. 

या सहा महिन्यांच्या काळात पूर्णपणे याविभागाचा आजच्या काळानुसार विकास करण्यासाठी प्रयत्न असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

शिक्षण विभागासाठी ‘थिंक टँक’ तयार करण्यात येत आहेत.

यामध्ये तज्ज्ञ मंडळी समाविष्ट असतील आणि विभागाचा परिपूर्ण अभ्यास व्हावा यासाठी रिंगटेन काम करेल असं देखील त्यांनी सांगितलं.

शिक्षणक्षेत्रात दिल्ली तेलंगणा राजस्थान या राज्यात काही चांगले प्रयोग होत आहेत.

महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रात अग्रणी आहे.

मात्र तरीही विविध राज्यातील शिक्षणातील प्रयोग यांचा विचार करून त्यापुढे जाऊन महाराष्ट्रात शिक्षणाचा एक पॅटर्न तयार केला जाईल, असं देखील वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *