Sun. Jun 20th, 2021

रेल्वे प्रवाशांना तृतीयपंथीयाकडून मनस्ताप; 4 वर्षांत 73,000 तृतीयपंथीयांना अटक

रेल्वेने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. मात्र या प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये सर्वात जास्त त्रास तृतीयपंथीयांकडून होत असल्याचं समोर आलंय.

रेल्वे मंत्रालयानं विशेष मोहीम हाती घेऊन गेल्या चार वर्षात 73 हजारापेक्षा तृतीयपंथीयाना अटक केली आहे. या वर्षी तब्बल 20 हजार तृतीयपंथीयांना अटक झाली आहे.

तृतीयपंथीयांकडून त्रास होत असल्याचा तक्रारी मोठ्या प्रमाणावर रेल्वेकडे येत होत्या.

धावत्या ट्रेनमध्ये तृतीयपंथी घुसून जबरदस्तीने पैसे मागतात.

पैसे नाही दिले तर अश्लील हावभाव करतात.

अनेकदा प्रवाशांना मारहाण करतात.

त्यामुळे प्रवाशांना मानसिक जाच होत होता.

 

वर्ष    – तृतीयपंथीयांना अटक

2015   –      13,546

2016   –      19,800

2017   –      18,526

2018   –     20,566

एकूण  –     73,837

महत्वाचं म्हणजे तृतीयपंथीयाचा जाच गेल्या काही वर्षापासून वाढत चालला आहे. गेल्यावर्षी 18 हजार तृतीयपंथीयांना अटक केली होती. तर यावर्षी रेल्वे पोलीसांनी 20 हजारापेक्षा जास्त जणांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *