Tue. Jun 15th, 2021

‘पापुआ’मध्ये पूर, 79 जणांचा मृत्यू

इंडोनेशियातील पापुआमध्ये अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे आतपर्यंत 79 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

या परिसरात भूकंप आणि पूर एकाचवेळी आल्यामुळे मृतांचा आकडा वाढणार असल्याची भिती वर्तवली जात आहे.

पूरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील नागरिक आपले जीव वाचवण्याचे प्रयत्न करत आहे. प्रशासनाद्वारे नागरिकांना वाचवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी जयापूरा जिल्ह्यातील अनेक गावांना पूराचा फटका बसला आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून जयापुरा भागात पावसाला सुरुवात झाली होती.

या परिसारतील घरे, रस्ते, पूल आणि इतर ठिकाणांना पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे.

तर पुरा पाठोपाठ आलेल्या भूकंपामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमावावे लागले आहे.

आतापर्यंत 4 हजार 200 नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे.

इंडोनेशिया येथे यापूर्वीही अनेक नैसर्गिक संकटे आली होती. या संकटामुळे येथे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तसेच जीवीतहानी मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *