Wed. Aug 4th, 2021

नालासोपारा येथे कोरोनाचा 7वा पॉझिटिव्ह रुग्ण

राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईनजीक असलेल्या वसई येथील नालासोपारा येथे कोरोनाचा ७वा पॉझीटिव्ह रुग्ण आढळला आहे. यामुळे नालासोपाराकर दहशतीत आहेत.

कोरोनाची लागण झालेली व्यक्ती जसलोक हॉस्पीटलमध्ये फ्लोर अटेंडटचं काम करते. या हॉस्पीटमध्ये कोरोना झालेला अमेरिकन नागरिकाला दाखल करण्यात आलं आहे. या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने फ्लोर अटेंडटला बाधा झाली, अशी माहिती महापौर प्रवीण शेट्टी यांनी दिली आहे.

या व्यक्तीला संसर्गाने कोरोना झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीच्या घरातील सदस्यांना क्वॉरंटाईन करण्यात आला आहे. घरातील ३ सदस्यांना क्वॉरंटाईन केलं गेलं आहे.

कोरोनाची लागण झालेली व्यक्ती नालासोपाऱ्यातील निलेमोरे गावातील रहिवाशी आहे. त्यामुळे ही कोरोनाग्रस्त व्यक्ती इतर कोणाच्या संपर्कात आली आहे का, याची चौकशी करुन पुढील योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असं महापौरांनी सांगितलं. तसेच नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे.

‘काळजी करु नका, सावध रहा’

वसईत कौल सिटीमध्ये २० खाटांपैकी १० खाटा आयसीयू, वाळीव मध्ये अग्रवाल हॉस्पीटलमध्ये १० बेडचं आयसीयू आणि २५ बेडचं आयसुलेशन सेटंरची सुविधा आहे. तसेच बोळीज येथे २० खाटाचं आयसुलेशन सेंटरची सोय केली आहे, अशीही माहिती महापौरांनी दिली आहे.

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रशासन म्हणून आम्ही तयार आहोत. तसेच काळजी करायचं कारण नाही, पण सावध रहा, असंही आवाहन महापौरांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *