Wed. Jun 26th, 2019

8 दिवसांत नाशिक बनणार राज्यातील पहिलं ‘भिकारीमुक्त शहर’!

0Shares

राज्यात पहिल्यांदाच भिकारी मुक्त शहर करण्यासाठी नाशिक पोलिसांनी पुढाकार घेतलंय. शहरात एक विशेष मोहिम पोलिसांनी हाती घेतली आहे. शहरातील भिकाऱ्यांचं पुनर्वसन करून ‘भिकारीमुक्त शहर’ करण्याचा संकल्प करण्यात आलाय. शहरातील भिकाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्याला आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हे पाऊल उचललंय. यासाठी विशेष पथकांची निर्मिती करून आठ दिवसांत ही मोहीम पूर्ण केली जाणार आहे.

8 दिवसांत शहरातील भिकाऱ्यांचा प्रश्न सुटणार?

नाशिक शहरातील चौकाचौकात आणि सिग्नलवर हार गजरे आणि फुगे विकणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय.

त्याचबरोबर फुटपाथ आणि रस्त्याच्या कडेलाही मोठ्या प्रमाणात भिकारी बसल्याचं आढळून येतंय.

इतकंच नव्हे तर काही महिला चार सहा महिन्यांची बाळं कडेवर घेऊन दिसेल त्याच्यासमोर हात पसरवत आहेत.

या सर्व गोष्टींचा त्रास नागरिकांना देखील सहन करावा लागतो.

शहरातील अनेक भिकाऱ्यांच्या आरोग्याचा देखील प्रश्न गंभीर आहे.

त्यामुळे ही परिस्थिती बदलविण्यासाठी नाशिक पोलीस सरसावलेय.

शहरात चार पथकांची निर्मिती करत आतापर्यंत चारशेहून अधिक जणांचा सर्व्हे करण्यात आलाय.

त्यात महिलांची आणि बालकांची संख्या विलक्षण असल्याने नाशिक पोलिसांनी ही बाब गंभीरतेने घेतलीय.

यापूर्वीही झाले होते प्रयत्न

शहरात यापूर्वीही भिकाऱ्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता. त्यावेळी देखील तीनशेहून अधिक भिकारी आढळून आले होते. मात्र या लोकांचा पुनर्वसन करण्यात अपयश आल्याचं पाहायला मिळालं होता. आता शहरातील काही सामाजिक संस्था आणि बाल कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच पोलिसांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन ही मोहीम राबवत असल्याने सामाजिक संस्थांनी देखील पोलिसांच्या या मोहिमेचं स्वागत केलंय.

कसं होणार भिकाऱ्यांचं पुनर्वसन?

शहरात अंदाजे 500 हून अधिक भिकाऱ्यांची संख्या आहे असं अंदाज आहे.

या सर्व लोकांचं सर्वेक्षण करून माहिती घेत या लोकांचं पुनर्वसन केले जाणार आहे.

तसंच काही लोकांना आदर आश्रमात देखील पाठवण्याचा पोलिसांचा मानस आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या लोकांचं आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झाला होता त्यामुळे या लोकांकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न होता.

अखेर नाशिक पोलिसांनी या भिकाऱ्यांचा पुनर्वसनासाठी पुढाकार घेतल्याने सामाजिक संस्थानी देखील या निर्णयाचा स्वागत केले फक्त हे काम पोलिसांनी पूर्ण करावा एवढीच अपेक्षा या सामाजिक संस्थांनी व्यक्त केली.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: