वय फक्त 8 महिने आणि वजन मात्र 17 किलो; राकट त्वचेमुळे इंजेक्शनही टोचलं जात नाही
वृत्तसंस्था, पंजाब
फक्त 8 महिने आणि वजन मात्र 17 किलो. विश्वास बसत नाहीए पण खरं आहे.
पंजाबच्या या मुलीचं नाव आहे चाहत कुमार. तिच्या वयोमानानुसार तिला चौपट आहार लागतो.
डॉक्टरांनाही तिच्या आजाराचं निदान होत नाही. चाहत कुमारची त्वचा राकट झाल्यानं तिच्या रक्ताचे नमुने घेण्यात डॉक्टर्सनाही अडथळा येतोय. या मुलीच्या कुटुंबियांची परिस्थितीही सर्वसामान्य असल्यानं तिच्यावर उपचाराचा प्रश्न निर्माण
झाला आहे.