Jaimaharashtra news

वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी कमावले 184 कोटी

मुंबई : युट्युब आता मनोरंजनाचं साधन न राहता कमाईचं माध्यम देखील झालं आहे. वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी पठ्ठ्यांनं काही कोटी रुपयांची कमाई केली आहे. युट्युबद्वारे अनेक युट्युबर्स नेटीझन्सचं मनोरंजनाद्वारे चांगलीच कमाई करतात.

रयान काजी या युट्युबर्सने 2019 या वर्षात 26 मिलियन म्हणजेच 184 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या युट्युबर्सचं वय अवघे 8 वर्ष इतंक आहे. रयान काजी असे या युट्युबरचं नाव आहे.

फॉर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार रयानने युट्युबर म्हणून या वर्षात सर्वाधिक कमाई करण्याचा मान पटकावला आहे. रयानने गेल्या म्हणजेच 2018 साली 22 मिलियन डॉलरची कामगिरी केली होती.
Ryan’s World असे रयानच्या युट्युब चॅनेलचं नाव आहे. या युट्युब चॅनेलचे सध्या 29 लाख इतके सब्सक्राइबर्स आहेत.

रयानच्या आई वडिलांनी 2015 ला हे युट्युब चॅनेल सुरु केंल होतं. विशेष म्हणजे या युट्युब चॅनेल व्हेरिफाय टीक देखील आहे.

या युट्युब चॅनेलच्या सुरुवातीपासून म्हणजेच 2015 पासून ते आतापर्यंत एकूण 35 बिलियन व्हुयुज मिळाले आहेत.

काय असतं व्हिडिओमध्ये ?

रयान युट्युब व्हिडियोमध्ये खेळण्यांसोबत खेळत असतो. नवनवीन खेळणी उघडून तो त्या खेळण्यांसोबत तो खेळतो. रायन आपल्या चॅनलद्वारे लहान मुलांच्या खेळण्यांचे review देतो.

हे review लहान मुलांसह त्यांचे पालका देखील पाहतात. रयानचे युट्युबवरील अनेक व्हिडियो हे 1 बिलियनपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहेत.

Exit mobile version