Sun. Oct 17th, 2021

कुटुंबाची उपजीविका चालविण्यासाठी पुन्हा शांताबाई पवार आजी पुण्यातल्या रस्त्यांवर कसरती करत

गेल्या वर्षी जुलै महिन्यात म्हणजे ऐन कोरोना लॉकडाउनच्या काळात एका आजीबाईंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शांताबाई पवार असं या आजीचं नावं होत. आजीचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक सेलिब्रिटींनी याची दखल घेतली होती आणि त्यानंतर अनेकांनी आजीबाईची मदत केली होती. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी वयाच्या ८५ व्या वर्षी कोरोनाच्या संकटातही या आजीबाई पुण्यातल्या रस्त्यांवर कसरती करून दाखवत होत्या. आणि आता देखील आजी या कोरोना काळात पुण्याच्या रस्त्यावर कसरती करतांना दिसत आहे. आजीने म्हटल्याप्रमाणे ‘मला सगळ्यांनी मदत केली, पण आमच्या घरातली मीच एकटी कमावती व्यक्ती आहे. जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत घरातल्यांचं पोट भरण्यासाठी मला हे काम करावंच लागणार आहे”, असं त्या सांगतात. आपल्या कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या या ८५ वर्षीय शांताबाई पवार रस्त्यावर पारंपारिक लाठी-काठीच्या कसरती करून पैसे कमावतांना दिसत आहे. या वयातही शांताबाई ज्या चपळाईने काठी फिरवतात, ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं कोरोना काळात लॉकडाउनमध्ये त्यांच्याही उपजीविकेवर टाच आली होती. त्यामुळे रस्त्यावर काठी फिरवून येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीवर त्या आपली उपजीविका चालवत होत्या.

शांताबाई यांचा काठी फिरवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्यांची मदत केली. बॉलिवुड अभिनेता सोनू सूद, रितेश देशमुख, गायिका नेहा कक्कड, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेकांनी शांताबाई पवार यांना मदतीचा हात दिला. त्याची अजूनही शांताबाईंनी आठवण ठेवली आहे. शांताबाई सांगतात गेल्या वर्षी मदत ही मिळाली होती मला गृहमंत्र्यांनी एक लाख रुपये दिले होते. सोनू सूद यांनी एक लाख रुपये दिले होते. त्याशिवाय २४ हजार वेगळे दिले होते. त्यानंतर पुन्हा मी आजारी पडले, तेव्हा सोनू सूद यांनी १६ हजार रुपये दिलेले. रितेश देशमुख यांनीही एक लाख रुपये दिले. नेहा कक्कड यांनी एक लाख रुपये दिले. सगळ्यांनी मदत दिली. आमच्यावर आधी जास्त कर्ज होतं. ते कर्ज आता पूर्ण फिटलं आहे,” असं शांताबाई यांनी सांगितलं. त्यामुळे पुन्हा शांताबाई त्यांना कुटुंबाची उपजीविका चालविण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं आहे. पुढे त्या सांगितात, ‘आम्ही गावाला घर बांधायला सुरुवात केली होती. अर्ध घर बांधून झालंय, पण पैसे अपुरे पडल्यामुळे अर्ध घर तसंच राहिलं आहे. गृहमंत्री साहेबांनी तिथल्या नगरसेवकांना सांगितलं होतं की आजीचं घर बांधून द्या. पण त्यांनी घर बांधून दिलं नाही. आता ते घर पावसाळ्यात पडून जाईल”, अशी भीती शांताबाईंनी व्यक्त केली आहे.

शांताबाई पवार यांच्या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटीज आणि नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. मात्र आता पुन्हा आजीबाई आर्थिक अडचणीत सापडल्या आहे. पुढे आजीबाईंनी सांगितलं की, लोकं त्यांना म्हणतात सरकारकडून मदत मिळाली तर तुम्ही कशाला रस्त्यावर जाता? पण माझ्या खात्यामध्ये काहीच नाहीये. मग मी रस्त्यावर नाही येणार तर माझ्या मुलांना कसं सांभाळणार? मुलांना सांभाळण्यासाठी जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी रस्त्यावर येतच राहणार,” असं शांताबाई सांगतात. शांताबाई या आर्थिक संकटात आहे. या कठिण काळात त्या मदतीचा हात हवा आहे. मात्र या कठिण काळात आजी कोण मदत करणार असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. कारण कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *