वसई-विरारमध्ये कोरोनाचा 8वा संशयित रुग्ण

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्यात वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचे वाढते आकडे हे चिंता वाढवणारी बाब आहे. अशातच आता वसई विरारमध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळला आहे.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा 8 वा संशयित रुग्ण सापडलेला आहे. वसई साईनगर येथील विभागामध्ये राहणाऱ्या एअर होस्टेस असलेल्या एका तरुणीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याआधी या तरुणीने कोरोना संदर्भात चाचण्या केल्या होत्या. पण तेव्हा कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

परंतु मंगळवारी रात्री तिला त्रास जाणवू लागला. तिला वसईतून हलवण्यात आले आहे. एकंदरीत या परिसराला संपूर्णपणे सील करण्यात आलेलं आहे.

नालासोपारा येथे कोरोनाचा 7वा पॉझिटिव्ह रुग्ण

Exit mobile version