पोलीसांनीच हडप केले 9 कोटी 18 लाख रूपये
जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
सांगलीत गेल्यावर्षी एका झोपडीत सापडलेल्या 3 कोटी रुपयांप्रकरणी 5 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पैसे तपासासाठी आलेल्या पोलिसांनी पळवल्याचा आरोप कोल्हापूरच्या एका बांधकाम व्यावसायिकाने केला आहे.
झुंझार सरनोबत असं या व्यावसायिकाचं नाव असून त्यांनी कोल्हापूरच्या कोडोली पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
13 मार्च 2016 ला मीरजेत एका झोपडीत 3 कोटी रुपये सापडले होते. याआधीही या प्रकरणात सांगली पोलिसांनी बुलेट गाडी घेण्यासाठी आरोपी मैनुद्दीन मुल्लाकडून पैसे घेतल्याप्रकरणी 2 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं होतं. तर या
घटनेमुळे सांगली पोलिसांची मोठी नाचक्की झाली आहे.