राज्यात कोव्हिशिल्डचे नऊ लाख डोस येणार

महाराष्ट्र: राज्यात आज कोव्हिशिल्डचे नऊ लाख डोस येणार आहेत. त्याचप्रमाणे १५ मेपर्यंत आणखी ९ लाख डोस येतील. राज्यात काही निवडक शासकीय, पालिका केंद्रांवर दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

१ मेपासून १८ वर्षे ते ४४ वर्षे वयाच्या लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी तीन लाख लसींचे डोस महाराष्ट्राला मिळाले होते. ४५ वर्षे वयाच्या लोकांसाठी लस आलेली नसल्यामुळे त्यांच्यासाठीचे लसीकरण बंद पडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून लसीचा साठा राज्यात कुठेही उपलब्ध नाही, त्यामुळे हे लसीकरण पूर्णपणे बंद पडले आहे.

महाराष्ट्रात ४,१०० लसीकरण केंद्रे उघडण्यात आली होती. त्यापैकी ३,५०८ केंद्रे लसीअभावी बंद करण्यात आली आहेत.

 

Exit mobile version