Fri. Aug 6th, 2021

उत्तर प्रदेशमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी, 9 ठार, 14 जखमी

उत्तर प्रदेशमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. यामध्ये 9 जण ठार झाले आहेत. तर 14 जण जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. यामध्ये 9 जण ठार झाले आहेत. तर 14 जण जखमी झाले आहेत. या घटनेत गोळीबार झाला या गोळीबारात 9 लोकांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशात झालेल्या या वादातील जमिनीच्या खरेदीची व्यवहार दोन वर्षांपूर्वी झाला होता.

सपाही गावचा प्रधान यज्ञ दत्त याने ही जमीन 10 वर्षापूर्वी खरेदी केली होती.

सपाही गावचा प्रधान यज्ञ दत्त खरेदी केलेली जमीन ताब्यात घेण्यासाठी गेला तेव्हा स्थानिकांनी त्याला विरोध केला.

तब्बल १०० एकर जमिनीवरून दोन गटांत हा वाद झाला आहे वादाचं रुपांतर हाणामारीत आणि नंतर गोळीबारात झालं.

या हाणामारीत अनेक जण गंभीर आहेत. मृतांमध्ये चार महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे.

ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महासंचालकांना या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *