Fri. Sep 30th, 2022

जाणून घ्या ‘WhatsApp’चे 9 सीक्रेट्स फिचर्स ! 

मेसेंजिंगसाठी Whatsapp चा वापर सगळेच करतात. Whatsapp वरून मॅसेज करणे, फोटोस, व्हिडीओस शेअर करणे याबरोबरच Whatsapp व्हिडिओ कॉलिंगही तुम्ही करत असाल. पण तुम्हाला माहीत आहे का,  Whatsapp मधील features रोज बदलत असतात. त्यातलेच काही features असे आहेत जे तुमचे काम सोप्पं करु शकतात. हे सिक्रेट फीचर कमालीचे आहेत. याचा तुम्ही वापर केला, तर Whatsapp वरचा तुमचा अनुभव एकदम भन्नाट होईल.

Media Visibility 

स्पेशल चॅटच्या मीडिया फाइल्सना hide करण्यासाठी या featureचा वापर होतो.

त्या कॉण्टॅक्ट इन्फोमध्ये जाऊन ‘Media Visibility’ ऑप्शनवर क्लिक केल्यास Default Yes, Yes and No हे तीन ऑप्शन्स दिसतील.

No ऑप्शनवर क्लिक केल्यास त्या चॅटची कुठलीही Media file तुमच्या फोन गॅलरीत save होणार नाही.

 

 

Mute Group Chat 

जास्त ग्रुपमध्ये सहभागी असून सतत येणाऱ्या नोटीफीकेशन्स थांबवण्यासाठी याचा उपयोग होतो.

ग्रुप इन्फोमध्ये जा त्यात ‘Mute Chat’ ऑप्शनवर क्लिक करा.

8 तासांपासून ते 1 वर्षापर्यंत ग्रुप चॅट म्यूट राहील आणि त्याचे नोटीफिकेशन तुम्हाला येणार नाही.

 

 

Disable Blue Tick

या फिचरला privacy चा विचार करुन डिझाइन करण्यात आले आहे.

Receive केलेला मॅसेज तुम्ही वाचला आहे हे या फिचरमुळे समोरच्या व्यक्तीला कळणार नाही.

Setting मध्ये जाऊन अकाउंटवर click करा.

privacy ऑप्शनवर जाऊन रीड रीसीट ऑप्शन डिसेबल करा.

त्यानंतर समोरच्याला हे कळणार नाही की तुम्ही मॅसेज वाचला आहे.

 

 

Hide Last Scene

या फिचरमुळे तुमचा लास्ट सीन समोरच्याला दिसणार नाही.

सेटींग्समध्ये जाऊन अकाउंट ऑप्शनवर क्लिक करा.

त्यात लास्ट सीनच्या ऑप्शनमध्ये जाऊन Nobody वर क्लिक करा.

यामुळे तुम्ही online कधी येऊन गेलात हे कळणार नाही.

 

 

Hide Personal Detail

तुम्हाला तुमची वैयक्तीत माहीती कोणाला दाखवायची नसेल तर या फिचरचा उपयोग करा.

सेटींग्समध्ये जाऊन प्रायवसीवर क्लिक करा.

त्यात Profile photo, About, Status चे ऑप्शन दिसतील.

या सर्वांनमधील Nobody ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुमची वैयक्तीत माहीती कोणालाही दिसणार नाही.

 

 

Dismiss As Group Admin

ग्रुपमधील Admin तुम्हाला पसंत नसल्यास तुम्ही त्याला काढू शकता.

Group Info मध्ये जाऊन त्या ग्रुप एडमिनच्या नावाला थोड्यावेळ press करावे.

Dismiss as Admin च्या ऑप्शनला सिलेक्ट केल्यास तो व्यक्ती ग्रुप एडमिन राहणार नाही.

 

 

Share Live Location

जर तुम्ही कुठे अडकला असाल किंवा समोरच्याला तुमचा रस्ता सांगण्यासाठी या फिचरचा उपयोग होतो.

चॅट बॉक्सच्या attachment menu वर क्लिक करावे त्यात शेअर लोकेशनचं ऑप्शन दिसेल.

लाइव लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुमच लोकेशन 15 मिनिट, 1 तास ते 8 तासापर्यंत शेअर राहील.

 

 

Storage Uses

दिवसभरात आपण कोणाशी किती चॅट केली हे जाणून घेण्यासाठी settings वर क्लिक करा.

सेटींग्समधील डेटावर क्लिक करुन स्टोरेज यूजेसवर क्लिक करा.

त्यात कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुपची रँकींग दिसेल त्यातुन तुम्ही कोणाशी जास्त चॅट केले ते कळेल.

 

 

What’s App Group Video Calling

या फिचरद्वारे तुम्ही एका वेळेस 4 लोकांशी व्हिडिओ कॉलिंग करु शकता.

 

व्हॉट्सअॅपवरील ‘या’ चुका पडू शकतात महागात

आता व्हॉट्सअॅप मेसेजला ‘या’ सोप्या पद्धतीने द्या रिप्लाय

असं करा व्हॉट्सअॅपवर स्वत:ला अनब्लॉक

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.