Wed. Dec 8th, 2021

गोव्यात दारु पिऊन धिंगाण्या घालण्याऱ्या 9 पर्यटकांना अटक

गोव्यात उघड्यावर दारु पिऊन धिंगाण्या घालणाऱ्या एकूण 9 पर्यटकांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून आलेल्या या 9 जणांना गोव्याच्या कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे.

दारु पिऊन धिंगाणा घातल्यामुळे या 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

समुद्रकिनारी, पार्किंग आणि फुटपाथवर दारु पिऊन गोंधळ घोलणाऱ्या आणि तेथील इतर पर्यटकांना त्रास देणाऱ्या व शांतता भंग करणाऱ्या 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

पेट्रोलिंग करताना ते निदर्शनास आले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती कळंगुटच्या पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.

यापूर्वी सप्टेंबर 2017 मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास बंदी घालण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे म्हटले होते.

याबाबतची अधिसुचना लवकरच काढली जाईल असे त्यांनी सांगितले होते, मात्र अद्याप त्याबाबतची अधिसुचना काढण्यात आलेली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने याबबातचे वृत्त दिले आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोघे कोल्हापूरातील असल्याचे समजत आहे.

तसेच यामध्ये कर्नाटकातील 4 जण आणि हैदराबादमधील 3 जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *