Mon. Jul 26th, 2021

चिमुकलीच्या डोळ्यातून पडले 21 खडे; व्हिडीओ व्हायरल

जळगावच्या चाळीसगाव येथे एका नऊ वर्षाच्या चिमुकलीच्या डोळ्यातून डाळीच्या आकाराचे खडे पडत असल्याची धक्कादायक घटना घडत आहे. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून डाळीच्या आकाराचे खडे पडत असल्याचे समजते आहे. आतापर्यंत 21 खडे पडल्याची माहिती चिमुकलीच्या वडिलांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं ?

सोशल मीडियावर अजब प्रकाराचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

मात्र जळगावमध्ये एक अजब प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे.

एका 9 वर्षाच्या चिमुकलीच्या डोळ्यातून डाळीच्या आकाराचे खडे पडत असल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून चिमुकलीच्या डोळ्यातून डाळीच्या आकाराचे पांढरट आणि काळ्या रंगाचे खडे पडत आहे.

आतापर्यंत 21 खडे पडले असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले आहे.

श्रद्धा पाटील असे या चिमुकलीचे नाव असून ती इयत्ता चौथीला शिकत आहे.

ही घटना समजताच परिसरातील नागरिकांना दैवी शक्ती तर डोळ्याचा आजार असल्याचे म्हणत आहे.

शेजारी खेळत असताना अचानक तिच्या डोळ्यातून खडे पडत असल्याचे लक्षात आले.

मात्र ही घटना कितपत खरी आहे ? किंवा असं घडू शकता का ? असा प्रश्न सगळ्यांना उपस्थित झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *