Sat. Jun 6th, 2020

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे.

उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात साहित्य मंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.  फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे  सृजनाचा मळा , गोतावळा, ओअॅसिसच्या शोधात , परिवर्तनासाठी धर्म , तेजाची पाऊले,  संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची , नाही मी एकला , सृजनाचा मोहोर, , आनंदाचे अंतरंग , आदी ग्रंथ प्रकाशित आहेत.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकामताने निवड करण्यात आली. ‘सुवार्ता’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीपर लेखन केले आहे. सुबोध बायबल – नवा करार’ या ग्रंथासाठी दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार मिळाला आहे. 2020 च्या जानेवारी मध्ये धाराशिव येथे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणयात येणार आहे.

या संमेलनात अध्यक्षाची निवड करण्यासाठी रविवारी 22 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात साहित्य मंहामंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने फादर फ्रान्सिस दिब्रिटो याचं नाव सुचवण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *