Tue. Oct 26th, 2021

मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादादरम्यान मंचावर गोंधळ

उस्मानाबादेत 93 वं मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी मंचावर गोंधळ झालेला पाहायला मिळाला. धर्माच्या मुद्द्यावरुन हा वाद झाल्याचं समजतं आहे.

समाजात बुवाबाजीचं प्रस्थ वाढलं आहे का ? या प्रश्नावरुन हा वाद झाला.

संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्याने समाजात बुवाबाजीचे प्रस्थ वाढत आहे या परिसंवादात व्यासपीठावर गोंधळ घालण्यात आला. धर्माच्या उच्चारणावरून वाद झाला होता.

डॉ जगन्नाथ पाटील यांनी हा गोधळ घातला होता. जगन्नाथ पाटलांनी काही जणांच्या सोबतीने स्टेजवर येत परिसंवाद बंद करण्याचा प्रयत्न केला.

हा सर्व गोंधळ पाच-सहा मिनिटं सुरु होता.

मला या परिसंवादात सहभागी व्हायचं आहे, असं म्हणत जगन्नाथ पाटील यांनी हा परिसंवाद बंद करण्याचा प्रयत्न केला.

मात्र या गोंधळानंतर अवघ्या काही वेळेत या परिसंवादाला सुरुवात झाली.

एका धर्मातील संतांबाबत या परिसंवादात बाजू का घेतली जात आहे, असा प्रश्न जगन्नाथ पाटलांनी उपस्थित केला. मला मंचावर एक वाक्य बोलू द्या, असं म्हणतं पाटलांनी मंचावर येऊन परिसंवाद बंद करण्याचा प्रयत्न केला.

यासर्व प्रकारानंतर त्यांना संमेलनाच्या आयोजकांनी मंचाच्या मागील बाजूस घेऊन गेले.

या सर्व गोंधळानंतर उपस्थित पोलिस तिथे आले. पोलिसांनी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं. यानंतर या परिसंवादाला सुरुवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *