Fri. Aug 12th, 2022

नागपूर रेल्वे स्थानकावर 98 जिवंत काडतुसं सापडल्याने खळबळ

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला यामध्ये भारताचे 41 जवान शहीद झाले. यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त करून या हल्ल्याचा बदला घेतला. यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.

यातच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर98जिवंत काडतुसं सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरील पलाट क्रमांक 7 वर ही जिवंत काडतुसं सापडली आहेत. घटनास्थळावर पंचनामा करून संपूर्ण बुलेट हस्तगत करण्यात आली आहेत. ही काडतुसे कोणाची, ती कोठून आली, याचा शोध रेल्वे पोलिस दल व लोहमार्ग पोलिसांनी सुरू केला आहे.

तीन बॉक्समध्ये सापडली काडतुसं

पलाट क्रमांक7 वर सफाई कामगार लीलाधर राऊत नेहमीप्रमाणे साफसफाई करत होते.

रेल्वेचे कर्मचारी लीलाधर राऊत हे खोलीत आले. ते खोली स्वच्छ करीत होते

राऊत यांना खोलात तीन बॉक्स आढळून आले. त्या बॉक्समध्ये 98 जिवंत काडतुसे आढळून आले.

आरपीएफ आणि नागपूर लोहमार्ग पोलिसांना याची माहिती मिळताच  त्यांनी घटास्थळी धाव घेतली.

नाशिकचे देवळाली रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आली असल्यामुळे तेथे खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.