महाकुंभात समाजमाध्यमावर प्रसिद्ध झालेली मोनालिसा चित्रपटात भूमिका साकारणार आहे.
महाकुंभात माळा विकणाऱ्या मोनालिसाला एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे.
दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी त्यांच्या पुढील चित्रपट ''द डायरी ऑफ मणिपूर'' मध्ये तिला महत्त्वाची भूमिका ऑफर केली आहे.
मोनालिसाला अभिनयाच्या मूलभूत गोष्टी शिकवणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
महाकुंभमध्ये माळा विकतानाचे मोनालिसाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आणि तिला प्रसिद्धी मिळाली.
सोशल मीडियावर तिच्या निष्पाप सौंदर्याची चर्चा नेटिझन्सनी सुरू केली.
काही दिवसांतच महाकुंभातील आखाड्यांना भेट देणारे शेकडो लोक तिला भेटण्यासाठी रांगेत उभे राहू लागले. लगेचच प्रसिद्धी इतकी वाढली की तिला माळा विकण्यासाठी जत्रेत फिरता आले नाही.