काजू हे एक फळझाड आहे. या फळाला विलायती मॅगो म्हणूनदेखील संबोधले जाते.
काजू खाण्याचे विविध फायदे आहेत. काजूमधील पोषक जीवनसत्त्वे शरीरसाठी उपयुक्त आहेत.
काजू हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. भिजलेल्या काजूचे सेवन केल्याने हृदयाच्या आरोग्याला फायदा होतो.
काजूच्या सेवनामुळे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाचा धोका कमी होतो.
काजू हे मॅग्नेशियमने समृद्ध आहे. जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
हाडे किंवा सांध्यांचे आजार असतील तर काजू खाण्यामुळे फायदा होऊ शकतो.
काजूमध्ये झिंक, तांबे आणि व्हिटॅमिन ई ही खनिजे आहेत. जी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते.
काजूमधील पोषक तत्त्वे जास्त काळ पोट भरलेले राहते आणि कमी भूक लागते. त्यामुळे चांगल्या वजन व्यवस्थापनासाठी काजू फायदेशीर आहे.