हिवाळ्यात फिरायला जात असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या
लोणावळा मुंबई-पुणे दरम्यानचं एक प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून लोणावळ्याची ओळख आहे. हिवाळ्यात लोणावला आणि खंडाळा परिसरात डोंगरस धबधबे आणि हिरवेगार जंगल खूप सुंदर दिसते.
महाबळेश्वर हे हिवाळ्यात भेट देण्यासाठीचे अत्यंत सुंदर ठिकाण आहे. पाचगणी, आर्थर सीट, एलिफंटा हेड पॉईंट अशा अनेक ठिकाणी निसर्गाचा अप्रतिम देखावा पाहायला मिळतो.
समुद्रकिनाऱ्याची ओढ असलेल्या पर्यटकांसाठी अलिबाग हा एक उत्तम पर्याय आहे. मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या अलिबागमध्ये समुद्राबरोबरच इतिहासप्रेमींना किल्लेदेखील पाहायला मिळतात.
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक आणि नैसर्गिक ठिकाण आहे. येथील शांतता आणि प्राचीन शिव मंदिरात हिवाळ्याच्या वातावरणात एकदम खास अनुभव मिळतो.
सातारा जिल्ह्यातील कास पठारावर हिवाळ्यात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांचे दृश्य पाहायला मिळते.