केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज देशाचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला.
12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर लागणार नाही.
2025 मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पातून केवळ पगारदारांचे 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे.
अर्थसंकल्पातील या घोषणेमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 70 हजारांची सूट देण्यात आली आहे.
तर 25 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 लाख वीस हजारांची सूट देण्यात आली आहे.