दंगलीत जखमी झालेल्या तरूणाचा पाच वर्षांनी मृत्यू

२०१४ साली सोशल मीडियावर शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे पुण्यात दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत सांगोला तालुक्यातील वसंत रुपनर यांच्या डोक्याला दगड लागून मोठी जखम झाली होती. प्राथमिक उपचार दिल्यानंतर डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे उपचाराचा खर्च करणे कठीण झाले. पाच वर्षानंतर २ मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नेमकं काय घडलं ?

२०१४ साली Facebook आणि Whatsapp या सारख्या सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात केले.

या पोस्टमुळे पुण्यात दगडफेक करण्यात आली.

वसंत रुपनर हे सांगोलाचे रहिवासी असून मुंबईत ड्रायव्हर म्हणून काम करत होते.

या दगडफेकी दरम्यान वसंत रुपनर गावी जाण्यासाठी एसटी बसने प्रवास करत होते.

मात्र गावी जात असताना पुण्यात या एसटी बसवर दगडफेक करण्यात आली.

या दगडफेकीत वसंत यांना डोक्याला दगड लागल्याने गंभीर जखमी झाले.

वसंत यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

मात्र डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात आले.

आथिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांच्या पत्नीला दुसऱ्याकडून पैसे मागावे लागले.

मात्र खर्च आवाक्याच्या बाहेर जात असल्यामुळे त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाही.

अखेर वसंत यांनी २ मे रोजी अखेरचा श्वास घेतला.

वसंत यांना या दगडफेकीमुळे आपला जीव गमवावा लागला.

Exit mobile version