वाढदिवसा दिवशी 27 वर्षीय तरुणाची हत्या

वाढदिवसा दिवशी मित्रानेच मित्राची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी जमा झालेल्या मित्रांमध्ये काही वाद झाल्याने ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. नितेश सावंत असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पंतनगर पोलीस स्थानकातील पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहे.

नेमकं काय घडलं ?

घाटकोपरमध्ये एका 27 वर्षांच्या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे.

नितेश सावंत असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा रविवारी वाढदिवस होता.

पूर्ववैमनस्यातून 7-8 जणांच्या टोळक्याने हत्या केल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी तरुणाचे काही जणांसोबत मोठा वाद झाला होता.

या वादाचा राग मनात ठेवून हत्या केल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली आहे.

पंतनगर पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे.

तसेच पोलीस आरोपींचा शोध घेत असून तपास सुरू आहे.

 

 

 

Exit mobile version