Thu. Aug 5th, 2021

१० वर्षांच्या शूर बालकाने वाचवले पाच जणांचे प्राण

रायगड : ११ जुलै रोजी रायगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुरुड तालुक्यातील काशिद समुद्र किनाऱ्यालगत रस्त्यावरील छोटा पुल वाहुन गेला होता. या दुर्घटनेत एक मोटर सायकल आणि कार वाहुन गेली.  मोटर सायकल स्वाराचा यामध्ये मृत्यु झाला तर १० वर्षांच्या एका बालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कारमधील प्रवाशांचे प्राण वाचले. या दहा वर्षांच्या शुर बालकाचा रायगडचे पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान केला आहे.

भायदे कुटूंबीय आपल्या अर्टिगा चारचाकीमधून मुरुड इथे फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी काशिद येथील पुल वाहुन गेला आणि या दुर्घटनेत भायदे कुटूंबाची कार सापडली गेली. कारमध्ये पाणी शिरले, कोणालाही कारमधुन बाहेर पडणे शक्य नव्हते. डोके काम करणार नाही अशा वेळी दहा वर्षाच्या श्री ने कारच्या मागील काचेवर हातपायाचे जोरदार ठोके मारून काच फोडली आणि वडिलांनी कारमधून भायदे कुटूंबाना बाहेर काढलं. श्रीने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे श्रीसह पाच जणांचे प्राण बचावले. श्रीच्या या शौर्याचे कौतुन रायगड पोलिस दलाकडून सन्मान पत्र देऊन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *