Wed. Oct 5th, 2022

कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला ब्रेक

कोकणातील सिंधुदुर्ग, रायगडमधील समुद्रकिनाऱ्यावर आजपासून म्हणजे 26 मेपासून 31 ऑगस्टपर्यंत जलक्रीडा प्रकार आणि किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद राहणार आहे. तसेच मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबतीत मेरीटाईम बोर्डाने निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे व्यावसायिक आणि पर्यटकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

त्यामुळे सिंधुदुर्ग तसंच रायगड किनारपट्टी भागातील गजबजलेली पर्यटन स्थळं आजपासून बंद होणार आहेत. परिणामी कोकणातील आर्थिक उलाढालीला ब्रेक लागला आहे.दरम्यान या बंदी कालावधीतही व्यावसायिकांनी वॉटर स्पोर्ट्स किंवा बोटिंग सुरु ठेवल्याचं दिसल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी दिला आहे.याचा फटका किनारपट्टीवरील व्यवसायिकांना झाला आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे २२ मार्च २०२० पासून सर्वच गोष्टींवर कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले होते. सर्व उद्योग बंद झाले होते. सप्टेंबर २०२० मध्ये काही उद्योग शिथिल करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढू लागल्याने पुन्हा एप्रिल २०२१ मध्ये सर्व बंद झाले. नुकतीच दुसरी लाट आटोक्यात आल्याने पुन्हा सरकारने सर्व उद्योग चालू केले सगळे निर्बंध शिथिल केले आहेत.

त्यामुळे कंटाळलेला पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे त्रस्त झालेले नागरीक आत्ता ‘पर्यटन स्थळी दाखल झाले आहेत.
पर्यटक कोकण ,महाबळेश्वर आणि विविध पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक या भागातील पर्यटक विशेषतः आजही दापोलीला पसंती देतात. दापोली तालुक्यामध्ये आलेल्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्राबरोबरच इतरही राज्यातून आलेल्या पर्यटकांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.