Tue. Jun 15th, 2021

लग्नाचे वऱ्हाड परत येत असताना गाडीचा भीषण अपघात

राज्यातील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. नुकताच डहाणू नाशिक मार्गावर पिकअपचा अपघात झाला आहे.

डहाणू नाशिक रोडवरील वेती येथे लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात झाला असून यात एकाचा मृत्यू तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत.

डहाणूतील गंजाड येथून लग्न कार्यक्रम आटोपून विक्रमगड सातखोर येथे वऱ्हाड जात होतं. तेव्हा भरधाव वेगात असणाऱ्या पिकअपवरच चालकांच नियंत्रण सुटल्याने वेती येथे पिकअप पलटी झाला.

या भीषण अपघातात नाना चोथे या 60 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून 22 जण गंभीर जखमी आहेत. पिकअपमध्ये जवळपास 40 वऱ्हाडी प्रवास करीत होते.

जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णायलात उपचार सुरू असून 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर एकाला गुजरातमधील वलसाड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं आहे. 

या ठिकाणी वारंवार अपघाताची मालिका सुरू असून याच ठिकाणी अपघातामध्ये दोन दिवसांपूर्वी दोन तरुणांचा देखील मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *