Fri. Aug 6th, 2021

मुंबईत बारावीच्या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल

बारावीची परीक्षा सुरू असताना परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन असल्याने विद्यार्थ्याला अटक करण्यात आलेली नसून त्याचा मोबाईल मात्र जप्त करण्यात आला आहे.

सांताक्रूझमधील कनिष्ठ महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे.

बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली.

मुंबईत पहिल्याच दिवशी  साडे अकराच्या सुमारास पर्यवेक्षकाला एक विद्यार्थी  मोबाईलवर  इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो काढत असल्याचे लक्षात आले आणि हा प्रकार उघड झाला.

विद्यार्थ्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.

त्याचा हेतू काय होता, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

विद्यार्थी परीक्षा केंद्रात मोबाईल घेऊन कसा काय पोहोचला, याचा देखील तपास केला जाणार आहे.

बारावी आणि दहावीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोबाईल, टॅब घेऊन जाण्यास बंदी आहे.

त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *