Wed. Jan 19th, 2022

‘मुंबईत मुक्या प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारणार’ – किशोरी पेडणेकर

मुंबईमध्ये अनेकदा मुकी जनावरे, प्राळीव प्राणी मृत अवस्थेत दिसतात. या प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी खाजगी स्मशानभूमी आहेत, परंतु तिथे अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. याच पार्श्वभूमीवर मुंबईत मुक्या प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुकी जनावरे आणि पाळीव प्राण्यांसाठी स्मशानभूमी कुठेच नाहीत आणि ज्या आहेत, त्या खाजगी आहेत. त्यामुळे मुक्या प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी खूप वेळ जात आहोत. आपण ज्या मुक्या प्राण्यांना आपल्या कुटुंबासारखे जीव लावतो आणि त्यांच्या जाण्याच्या दु:खात असताना त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी खूप वेळ जात असेल तर त्याचा त्रास आपल्यालासुद्धा होतो. त्यामुळे मुंबईत आता मुक्या प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच दहिसर येथे स्मशानभूमीत पाळीव प्राण्यासाठी शवदाहिनी उभारणार असल्याचा निर्णय मुंबई महापौरांनी घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक निघाले असून अभिषेक घोसाळकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्या येथ पहिल्यांदा पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनी बांधण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *