KDMC क्रीडा संकुलाच्या नादुरुस्त गेटमुळे लहान मुलगा जखमी

KDMC च्या सावळाराम क्रीडासंकुलाचं प्रवेशद्वार गेले दोन वर्षे तुटलेल्या अवस्थेत आहे. यासंदर्भात अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करूनही त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. अखेर महापालिकेच्या याच निष्काळजीपणाचा फटका गेल्या मंगळवारी ईशान खोत या मुलाला बसला आहे.
ठाकुर्ली येथे राहणारा ईशान खोत विद्या निकेतन शाळेचा विद्यार्थी आहे.
रोज शाळेनंतर तो व्यायाम करण्यासाठी पालकासोबत तो संकुलात जात असतो.
मात्र मंगळवारी प्रवेश करताना गेटचा एक रॉड त्याच्या पायावर पडला.
या अपघातात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
हाच रॉड जर त्यांच्या अंगावर पडला असता, तर तर जबाबदार कोण, असा सवाल ईशानच्या आईने केलाय. आतापर्यंत त्याला उपचारार्थ सात हजार खर्च आलाय. अजूनही तो घरीच आहे.
क्रीडासंकुलात येणाऱ्या खेळाडूंच्या संरक्षणाची जबाबदारी महापालिकेची आहे. तरी पालकांना योग्य माहिती घेऊन दक्षता घेण्यात येईल, असं उत्तर पालिका अधिकाऱ्यांनी दिलंय. पण हे प्रवेशद्वार बदलून नवीन बसवण्याची मानसिकता मात्र महापालिकेची अजूनही दिसत नाही. अजून काही अपघात होण्याची महापालिका वाट पाहतेय का असा प्रश्न पालक करत आहेत. तसेच आमचा झालेला खर्च महापालिकेने भरून द्यावा अस मत ईशानच्या पालकांनी ‘जय महाराष्ट्र’कडे व्यक्त केलंय.