Fri. Aug 12th, 2022

मुंबईत वांद्र्यात कोसळले घर

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शास्त्री नगर येथील दोन मजली इमारत कोसळली आहे. मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयता दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची बातमी मिळताच अग्निशम दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्य सुरू केले.

मुंबईचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री १२.१५ च्या सुमारास इमारत कोसळली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून १६ जणांना रुग्णालयात दाखल असून ते आता सुरक्षित आहेत. हे सर्व बिहारमधील मजूर आहेत. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, पोलीस, एक रुग्णवाहिका आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का याचा शोध घेण्यात येत आहे. अशा परिस्थितीत बचावकार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.