Tue. Dec 10th, 2019

चार लग्न करून गंडा घालणारी ‘ती’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात

काहीच दिवसांपूर्वी नववधू तिच्या बॅायफ्रेंडसोबत पळून गेल्याची घटना ताजी असताना मनमाड मध्ये एका तरूणीने चक्क चार जणांशी लग्न करून त्यांची फसवणूक केल्याचं एका तरूणाने उघडकीस आणले आहे. ही 22 वर्षीय तरूणी चक्क पाचव्या लग्नाच्या तयारीत होती. तीने आणि तिच्या कुटुंबियांनी केवळ पैशाच्या लालसेपोटी हे कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी तरूणीसह तिचे आईवडिल, लग्न जूळवून देणारी महिला आणि पुरूष अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले ?

ज्योती बेंद्रे नामक 22 वर्षीय तरुणीने पैशांसाठी चक्क 4 वेळा विविध पुरुषांशी लग्न केलं. 

दरवेळी  विवाह करून मुलगी मुलाकडील संपत्ती लुटून पळून जात असे.

या कटात तिच्या आईवडिलांचाही सहभाग होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमाडच्या संभाजीनगर येथील अशोक डोंगरेंचा मुलगा नरेश याला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालू होता.

त्यावेळी अशोक यांची ओळख पूजा भागवत गुळेशी झाली.

या महिलेने तिच्या ओळखीतले लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मधील एक स्थळ अशोकना त्यांच्या मुलासाठी सुचवलं.

अशोक डोंगरेंना त्यांच्या मुलासाठी सूचवलेलं स्थळ पसंत पडलं.

परंतु, लग्नाआधी अट घालण्यात आली की नवऱ्या मुलीच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने नवऱ्या मुलालाच लग्नाचा खर्च उचलावा लागेल.

गरिबाघरची मुलगी म्हणून डोंगरेंनी ज्योतीच्या आईवडिलांना 40,000 रोख आणि तिच्या अंगावर 50,000 रूपयांचे दागिने दिले.

इतकेच काय लग्नाचा सगळा खर्चसुद्धा नवऱ्या मुलाने उचलला.

लग्नानंतर काहीच दिवसांत तरूणी माहेरी गेली, परंतु ती परत आलीच नाही.

पुन्हा पुन्हा बोलावूनही तरूणी येत नसल्याने अशोक डोंगरेंचा संशय बळावला .

या संबंधी तपास केला असता ज्योतीचे या पुर्वी तीन लग्न झाल्याचे त्यांना लक्षात आले.

केवळ इतकेच नाही तर ती पाचवे लग्न करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांना कळाले.

या मागे त्या ज्योतीसह, तिचे आईवडिल, लग्न जूळवून देणारी महिला आणि पंडित अशी पाच जणांची टोळी असल्याचं समजल्यावर अशोकला धक्का बसला.

आपण लुबाडले गेल्याचे लक्षात येताच ताबडतोब अशोक यांनी पोलिसात या टोळीची तक्रार दाखल केली.

पोलीसांना सापळा रचत मोठ्या हुशारीने या टोळीवर कलम 420, 494, 495 आणि इतर कलम लावत त्यांना गजाआड केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *