Fri. Jun 21st, 2019

हस्तमैथून करत हत्या करणाऱ्या Serial Killer ला अटक

178Shares

एका महिलेच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या आरोपीने आत्तापर्यंत 90 हत्या केल्याची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा serial killer हस्तमैथून करत हत्या करत असे.

जेव्हा अमेरिकन पोलिसांनी एका महिलेच्या हत्येप्रकरणी 78 वर्षीय सॅम्युअलला अटक केलं, तेव्हा अनेक खळबळजनक गोष्टींचा खुलासा झाला.

Serial Killer चं विकृत कांड

फ्लोरिडा येथे सॅम्युअलने तब्बल 90 जणींची हत्या केली होती.

या हत्येमागे कोणतेही कारण नव्हतं.

व्यसनी आणि देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची तो हत्या करत असे.

तसंच गरीब महिलांनाही तो आपलं लक्ष्य बनवत असे.

30 ते 40 वर्षांपूर्वी त्याने बहुतेक हत्या केल्या होत्या.

त्याला आपल्या हाताने मारलेल्या प्रत्येक महिलेचा चेहरा लक्षात होता.

सॅम्युअल हत्या करण्याआधी महिलेला बेशुद्ध करत असे.

त्यानंतर हस्तमैथुन करत तिचा गळा दाबून ठार मारत असे.

आपल्या दुष्कृत्याचा कोणताही पुरावा तो मागे सोडत नसे.

गेली 40 वर्षांपासून तो विविध देशांमध्ये प्रवास करत असे.

 

सॅम्युएलला सध्या अटक करून कारागृहात ठेवलं आहे. मात्र आपल्याला दुसऱ्या कारागृहात हलवण्यात यावं अशी मागणी त्याने केली आहे. त्याला आपली शिक्षा टेक्सास कारागृहात भोगायची इच्छा आहे. त्याच्या या इच्छेमागचं कारण अद्याप समजलेलं नाही.

178Shares

Leave a Reply

%d bloggers like this: