Sat. Jun 19th, 2021

शिर्डीच्या प्रसादलयात भाविकांना आमरस पुरीचे प्रसाद

आंब्याचा सीझन सुरू असल्यामुळे सगळीकडे आमरस पुरीचा बेत आखला जात असताना शिर्डीमध्ये साईभक्तांना प्रसादलयाच्या भोजनात आमरस पुरीची मेजवानी देण्यात येत आहे. शिरूर येथील दीपक नारायण करगळ यांनी साईबाबांच्या चरणी 7 हजार 740 किलो केशर आंबे अर्पण केले आहे. त्यामुळे भाविकांना प्रसादलयात या आमरसाचा आस्वाद घेता आला आहे.

शिर्डीमध्ये साईभक्तांना आमरसाचा प्रसाद –

शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी  शिरूरच्या भाविकाने केशरचे 7 हजार 740 किलो आंबे अर्पण केले आहे.

आंब्याचा सीझन सुरू असल्यामुळे इतर भाविकांना प्रसादलयात आमरस पुरी खाण्यास मिळावी म्हणून अर्पण केल्याचे समजते आहे.

दीपक नारायण करगळ असे अर्पण करणाऱ्या भाविकाचे नाव आहे.

दीपक यांनी अर्पण केलेल्या आंब्याचे रस काढण्याच्या कामाला प्रसादलयात सुरुवात झाली आहे.

साईभक्तांनी अर्पण केलेल्या वस्तू प्रसादलयात इतर भाविकांना मोफत जेवण दिले जाते.

या प्रसादलयात सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना जेवण देण्यात येते.

शिर्डीच्या प्रसादलयात दररोज किमान चाळीस ते पन्नास हजार भाविक भोजनाचा लाभ घेण्यास येतात.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *