Wed. Jul 28th, 2021

दिल्लीत पोलिसांनी दंड आकारल्यामुळे तरुणाने जाळली बाईक

दिल्लीमधील राकेश नावाचा तरुण दारुच्या नशेत गाडी चालवत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडून 25 हजार रुपये दंड आकरला. या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्याने आपल्या बाईकला आग लावली आहे.

देशात नविन मोटर व्हेहीकल एक्ट २०१९ लागू झाल्यापासून ट्रॅफिक नियम तोडल्यावर जास्त प्रमाणात पेनल्टी भरावी लगात आहे. काही गाड्यांचे तर चलन गाडीच्या किमंतीपेक्षाही जास्त आहे. पोलीस आता यावर कठोर कारवाई करत असून दिल्लीमध्ये एका तरुणाकडून २५ हजार रुपये दंड आकारल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी एवढा मोठा दंड आकारल्यामुळे तरुणाने रागाच्या भरात चक्क बाईकला आग लावली आहे.

नेमकं काय घडलं ?

दिल्लीमधील मालवीय नगर भागात पोलीस तैनात असताना दारुच्या नशेत एक तरुण गाडी चालवत होता.

पोलिसांनी या तरुणाकडून २५ हजार रुपयांचा दंड आकारला.

राकेश असे या तरुणाचे नाव असून जास्त दंड आकरल्यामुळे त्याला राग आला.

या रागाच्या भरात तरुणाने बाईकमधील पेट्रोल काढत पेटवून दिले.

तरणाच्या अशा वागण्यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे.

बाईकला आग लावल्याची माहिती पोलिसांसह अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

मात्र पोलिसांनी राकेशच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *