सोन्याच्या किंमतीत घसरण, तर चांदीच्या किंमतीत वाढ

दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. सण-उत्सवाच्या दरम्यान अनेकजण सोन्याची खरेदी करतात. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सोन्याच्या किंमतीत ०.१० टक्क्यांनी घसरण झाली आहे.
सोन्याच्या किंमतींत घट होऊन सोने ४७,७६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. सोन्याच्या किंमतीत घट झाली असून दुसरीकडे चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. चांदीच्या किंमतीत ०.०९ टक्क्यांनी वाढ झाली असून चांदीची किंमत ६५,०५० इतकी झाली आहे.
मागील वर्षी १० ग्रॅम सोन्याची किंमत ५१,०७९ रुपये इतकी आहे. मात्र यावर्षी सोने स्वस्त झाले असून आजच्या दिनी सोन्याची किंमत ४७,७६५ रुपये इतकी आहे. सोन्याचा भाव हा आंतरराष्ट्रीय बाजारांवर अवलंबून असतो. आंतरराष्ट्रीय बाजारांच्या चढउतारावर सोने-चांदीचा भाव अवलंबून असतो.