Thu. Sep 16th, 2021

मावळात कुसगाव खुर्द येथे पाण्याच्या खाणीत बुडून दोन मुलांसह वडिलांचा बुडून मृत्यू

मावळात कुसगाव खुर्द येथे पाण्याच्या खाणीत बुडून दोन मुलांसह वडिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. पिराजी सुळे,सचिन,आणि साईनाथ पिराजी सुळे, अशी मृत्यू पावलेल्या बापलेकांची नावे आहेत. पिराजी दोन्ही मुलांना घेऊन कुसगाव खुर्द येथील धबधबे पहायला गेले असता, धबधब्याच्या पायथ्याशी उत्खनन केलेल्या खाणीत पाणी होते. या खाणीत दोन मुले बुडू लागल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पिराजी याचाही बुडून मृत्यू झाला आहे.

एका शेतकऱ्याने यांना बुडताना पाहिले आणि आरडाओरड करून लोकांना गोळा केलं. खाणीच्या दलदलीतून बाहेर काढले उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केलं. या घटनेचा अधिक तपास कामशेत पोलीस करत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *