Jaimaharashtra news

रानू मंडल याच्या जीवनावर होणार चित्रपट

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्याच्या व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध झालेल्या रानू मंडल याच्या जीवनावर आता चक्क सिनेमा बनतोय.  बॉलिवूड अभिनेता, संगीत दिग्दर्शक आणि गायक हिमेश रेशमियांच्या आगामी चित्रपटात ‘तेरी मेरी काहानी’ हे त्यांनी गायलेलं गाणंही आधीपासूनच गाजतंय. मात्र एवढ्या पुंजीवर आता सिनेमादेखील बनवण्याचा घाट Bollywood निर्मात्यांनी घातलाय.

काय असेल या सिनेमात?

रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या रानू मंडल यांच्या जीवनावर आता बायोपिक बनवण्यात येणार आहे.

रेल्वे स्थानकांवर गाणे गाण्यापासून ते बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायिका हा जीवनप्रवास फारच खडतर होता.

त्यांचा जीवनप्रवास ऐकूण प्रेरित झालेल्या  चित्रपट निर्माते ऋषिकेश यांनी रानू मंडल यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे्.

ऋषिकेश  यांनी रानू मंडल यांच्या भूमिकेसाठी दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री सुदीप्ता चक्रवर्ती हिची निवड केली आहे.

सुदीप्ताने याबाबत खुलासा केला आहे.

मला रानू मंडल यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची ऑफर आली आहे. चित्रपट करायचा का नाही याचा निर्णय ती स्क्रिप्ट वाचल्यानंतरच घेणार आहे, असे ती म्हणाली.

सुदीप्ताने चित्रपट करण्यास होकार दिल्यास ऑक्टोबरमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे असे ऋषिकेश यांनी सांगितले आहे.

याचबरोबर ऋषिकेश यांनी सांगितले या चित्रपटात सोशल मीडियीची ताकद किती आहे हे सुद्धा दाखवण्यात येणार आहे.

रानू मंडल यांचा प्रेरणादायी प्रवास हा सर्वांनाच पाहायचा आहे. रानू मंडल याच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत.

Exit mobile version