Tue. May 17th, 2022

नवी दिल्लीतील इमारतीला लागलेली आग आटोक्यात

पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळील तीन मजली व्यवसायिक इमारतील शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउऊर तयार करणाऱ्या कंपनीचे कार्यालय आहे. या आगीत होरपळून २७ जणांचा मृत्यू झाला आहे तर १२ जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या इमारतींमधून ६० ते ७० जणांना बाहेर काढण्यात आले तसेच रात्री उशिरापर्यंत काहीजण आत अडकले होते.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ४ वाजता आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आग इमारत सर्वात आधी पहिल्या मजल्यावर आग लागली आणि ती आग दुसऱ्या मजल्यावर पसरली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करण्यात आले. २६ मृतदेह बाहेर काढले परंतू हे मृतदेह ओळखण्यापलिकडचे आहे. आगीत २० जणांचा मृत्यू होरपळून आणि गुदमरून झाल्याची माहिती पोलीस आयुक्त समीर शर्मा यांनी दिली आहे.

दरम्यान, नवी दिल्लीत इमारतीला लागलेल्या भीषण आगीत २७ नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या अग्नीतांडवाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत हळहळ व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.