Sun. Jun 20th, 2021

खाद्य तेल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग

रायगड जिल्ह्यातील  मुंबई पुणे मार्गावरील खालापुर येथील अलाना या खाद्य तेल कपंनी कंपनीत भीषण आग लागली आहे.

आग इतकी भीषण होती की संपुर्ण प्लाँट आगीत जळून खाक झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच आगीमुळे आकाशात मोठे धुराचे लोट पाहायला मिळत आहेत.

आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

मात्र, तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून खोपोली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे.

सुदैवाने या आगील कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

अग्नीशमन दल, खाजगी टँकर, पोलीस प्रशासन आदी यंत्रणांमार्फत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

तसेच या कंपनीला लागूनच इंडियन ऑईल कंपनी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *