Mon. Jul 22nd, 2019

व्हॉट्सॅप ग्रुपवरील ओळखीतून विवाहितेवर बलात्कार!

0Shares

पाळीव प्राण्यांची आवड असणाऱ्यांच्या एका व्हॉट्सॅप ग्रुपवरील एका माणसाशी ओळख पिंपरी-चिंचवडमधील विवाहितेसाठी अतिशय वेदनादायी ठरली आहे. याच ग्रुपमध्ये ओळख झालेल्या एका पुरुषाने विवाहितेशी मैत्री करून तिला धमकावत तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. अखेर या विवाहितेने हिंजवडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

काय घडलं नेमकं?

एका श्वान प्रेमी लोकांच्या व्हॉट्सॅप ग्रुपवर 39 वर्षीय पीडितेची साईनाथ शेट्टी या 44 वर्षीय व्यक्तीशी ओळख झाली.

दोघंही एकमेकांना प्रत्यक्षात भेटले नसले, तरी दोघांचं एकमेकांशी चॅटिंग होत असे.

मूळचा मुंबईचा असणाऱ्या साईनाथने पीडितेला एकदा भेटण्याची गळ घातली.

महिलाही या मित्राला एकदा प्रत्यक्षात भेटावं, असा विचार करून विश्वासाने हॉटेलमध्ये गेली. मात्र साईनाथचा इरादा काही वेगळाच होता. त्याने पीडितेवर बलात्कार केला.

एवढंच नव्हे, तर या सर्व कुकर्माचं मोबाईलवर शुटिंगही केलं.

त्यानंतर ही अश्लील मोबाइल क्लिप पॉर्न वेबसाईटवर व्हायरल करायची धमकी देऊन आरोपी तिला कधीही आणि कुठेही वारंवार बोलावून बलात्कार करू लागला.

तिने नकार दिल्यास आरोपी तिला मारहाणही करत असे. विवाहितेला 15 आणि 8 वर्षांची मुलं आहेत.

तिच्या कुटुंबाचं काही बरंवाईट करायची धमकीही आरोपी पीडितेला देत असे आणि तिच्यावर बलात्कार करत असे.

आरोपीपासून महिला 7 महिन्यांची प्रेग्नंट झाली.

या सर्व प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने अखेर हिंजवडी पोलिसांत तक्रार दाखल केली.

आरोपी साईनाथ शेट्टी हा थेरगावला राहत असून मूळचा मुंबईच्या अंधेरी परिसरातील आहे. पोलीस तक्रारीनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमधून कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी व्हॉट्सॅप ग्रुपवरील मोघम ओळखीवरून मैत्री करणं किती घातक ठरू शकतं, हेच दिसून आलंय.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: