कल्याणमध्ये दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण

कल्याण: कल्याणमधील कोळसेवाडी भागामध्ये दोन तरुण आणि एक तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. राहुल गडेकर आणि बंटी प्रधान असे मारहाण झालेल्या तरुणाची नावे असून ते उल्हासनगर भागात राहतात.
शनिवारी मध्यरात्री राहुल आणि बंटी यांची एक मैत्रीण रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षाचालक तिची छेड काढू लागला. तिने फोनवरुन याची माहिती तिच्या मित्रांना दिली. यानंतर हे दोघे मित्र त्या ठिकाणी पोहोचले. मात्र या ठिकाणी आल्यावर रिक्षाचालक आणि गावातील लोकांनी या तरुणांना जोरदार मारहाण केली. सोबतच तरुणीलाही बेदम मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केला नसून मारहाण झालेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे तरुण अजूनही पोलीस ठाण्यात दाखल आहेत.